Child Counseling

मुलांची मानसिकता

ADHD Assessment

मुलं हि देवाघरची फ़ुलं म्हटलं जाते. ते अगदी खरे आहे याची प्रचिती दिवसेंदिवस येत आहे. त्यांना अगदी नाजुकप्रकारे जपावे लागते. मी गेले १३ वर्षे या क्षेत्रात काम करत आहे. नेहमी नवनवीन अडचणी घेवून पालक आम्हाला भेटायला येतात. कधी स्वतःहून, तर कधी डॉक्टर पाठवतात तर कधी त्यांना शाळा सुचवते. पूर्वी शाररीक आजार घेवून पालक डॉक्टरांकडे जायचे पण दिवसेंदिवस मानसशास्त्राची गरज मला वाढलेली दिसते. मानसशास्त्र हे सगळ्या वयाच्या टप्प्यात काम करतात. पूर्वी मानास्शात्राकडे जाणारी व्यक्ती म्हणजे “वेडा”त्यालाच गरज लागते. पण आताच्या पिढीने थोड्या वेगळ्या दृष्टिने या क्षेत्राकडे पाहायला हवे आणि तसेच आपल्या मुलांमधील बदल सुद्धा टिपायला हवेत.

मग पालक म्हणून  कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात असे प्रश्न तुम्हांला पडला असेल काही मानसशास्त्रीय मुख्य  नावे तुमच्या निदशर्नात
आणून  देते ती म्हणजे ….

 • अटेन्शनडेफिसिट  हायपर  अॅक्टीव डीसॉरडर (Attention Deficit Hyperactive Disorder) :
  यामध्ये तीन प्रकार पडतात  १.  लक्ष नसणे २. चंचलता आणि ३.अस्थिरता. यातील कोणत्याही गोष्टीमुळे मुलांना त्रास होताना दिसतो.याचा परिणाम त्यांच्या  दैनंदिन जीवनात पाहायला मिळतो.जसे कि अभ्यास करताना एका जागी स्थिर न बसणे, घाई करणे, लहान सहान  चुका करणे. अशा विविध अडथळ्यामुळे खूप त्रास होताना दिसतो.
 • ऑटीझम(Autism). :
  अशी मुले स्वमग्न असतात, नजरेला नजर देत नाहीत.  सतत एकच कृती करत राहतात. पुनरुचारण करतात. इतरांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. इतरांमध्ये मिसळून वागत नाहीत
 • लर्निंगडीसायबलिटी (Learning Disability):
  वाचताना  चुका करणे , अक्षरे आणि आकडे उलटी लिहिणे, डाव्या – उजव्या दिशांमध्ये गोंधळ होणे, एकाच  वेळी अनेक सूचनांवर कार्य करण्यात अडचणी  येणे .
 • स्लोलर्नर (Slow Lerner) :
  शालेय जीवनात मागे पडणे अभ्यास लक्षात न येणे शिकवलेले पटकन न कळणे आज पाठ केलेले उद्या विसरणे सामाजिक परिपक्वता नसणे इतरांशी  कसे वागायचे न कळणे.
 • वर्तन समस्या(Behavioral Issue):
  मोठ्यांशी उलट बोलणे वाद घालणे इतरांना मारणे, खोड्या काढणे चिडवा-चिडवी करणे शिव्या देणे कोणाशीही न पटणे. इतरांना इजा करणे. मी म्हणतो तेच बरोबर असल्यासारखे वागणे.
 • गेझेटव्यसन (Game Addiction):
  मुलांमध्ये सरस गेझेट  चे व्यसन पाहायला मिळते. हे व्यसन जितके तंबाखू, सिगारेट किंवा ड्रगचे असते. तितकेच भयंकर हे व्यसन आहे. माझ्याकडे हा  विषय घेवून पालक येतात. ते अगदी त्रस्त झालेले पहायला मिळतात . मुल अभ्यास करत नाही, कोणत्याही कार्यक्रमात भाग घेत नाही , नुसते मोबाईल किंवा आय पोड वर खेळत असतात, त्यांना  जेवणाचे ही भान नसते त्यामुळे काही दिवसांनी त्यांच्या शरीरावर याचे परिणाम पहायला मिळतात.

Child Psychology

वरिल कोणत्याही प्रकारात तुमचे मुल मोडत असेल तर तुम्हांला मानसशास्त्रीय  सल्ला घेण्याची गरज आहे. बऱ्याचदा पालक याची दखल घेत नाही. परंतु शाळेतून बऱ्याचदा मुलांना सांगितले जाते आणि मग मुलांना तसेच पालकांना याचा त्रास होताना दिसतो. तर पालकांनी जागृक राहायला हवे. ह्या काहीही समस्या जाणवल्यास त्वरित मानसोपचारांना भेटल्यास तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. जर लवकरात लवकर लक्षात आले तर तितक्याच लवकर काही चाचण्या करून थेरपी करता येते. मुलांबरोबर पालकांनाही कौन्सलिंग केले जाते .

पालकांसाठी काही टिप्स :

जर लहानपणापासून बाळाशी बोलत राहिलात तर शक्यतो बाळ लवकर बोलायला लागते. अक्टिव राहते. आधुनिकीकारामुळे  बऱ्यापैकी बाजारात खेळणी विकत मिळतात. काही खेळणी हि तुमच्या बाळाची कल्पकता (Creativity) तर्क क्षमता (Logical Reasoning ) समस्या सोडविणे (Problem Solving) अशा गोष्टी वाढवतात. त्याच्या वयाप्रमाणे विविध खेळणी आणून दिल्यास मुलांच्यात प्रगती दिसून येते. तसेच क्ले, स्पंज चेंडू, कोडी अशा गोष्टी घेवून मुलांनबरोबर खेळणे, विविध रंगीत पुस्तके आणून देणे. त्यांना जवळ घेवून त्यांची ओळख करून देणे. चित्रावरून गोष्ट तयार करून सांगणे. मुलांना शक्यतो गार्डन मध्ये घेवून जाणे. त्यांच्याबरोबर खेळणे, इतर मुलांशी खेळण्यास भाग पाडणे. त्यामुळे मुले देवाण घेवाण शिकतात, इतरांत मिसळणे आपली खेळण्याची पाळी येईपर्यंत वाट पाहणे तसेच नियम ह्या सर्व गोष्टी त्याच्या लक्षात येतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे  त्यांची शाररीक तसेच मानसिक वाढ होताना पहायला मिळते.

काही डूज अन्ड डोन्ट :

पालकानी हे करावे :

 • understanding child psychologyमुलांशी वेळ काढून गप्पा मारा.
 • त्यांना बोलण्यास प्राधान्य द्या .
 • त्यांचे बोलणे लक्ष देवून ऎका .
 • त्यांचाशी बोलताना नजरेला नजर देवून बोला .
 • शक्यतो मुलाला दिलेले वचन पाळा
 • कौतुकाने जवळ घ्या .
 • त्यांच्याशी वेळ काढून गप्पा मारणे.
 • काही मुल्य तुम्ही जपा.
 • जितके जमेल तितके त्यांनी केलेक्या कृतीची दखल घेणे. म्हणजेच कौतुक करणे किंवा चुकीची गोष्ट केल्यावर चूक समजावून देणे.

पालकानी हे करू नये :

 • मुलांसमोर मोठ्याने किंवा आरडा ओरड करून बोलू नका.
 • मुलांसमोरअपशब्द किंवा वाईट बोलू  नका .
 • मुलांसमोर शक्यतो खोटे बोलू  नका .
 • त्याच्या चुका इतरांसमोर मांडू  नका.

पूनम घाडीगावकर

मानसशास्त्रज्ञ

दिशा कौन्सलिंग सेंटर

९८१९४७८५३८/०२२२४३८४५७५

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *