मुलं हि देवाघरची फ़ुलं म्हटलं जाते. ते अगदी खरे आहे याची प्रचिती दिवसेंदिवस येत आहे. त्यांना अगदी नाजुकप्रकारे जपावे लागते. मी गेले १३ वर्षे या क्षेत्रात काम करत आहे. नेहमी नवनवीन अडचणी घेवून पालक आम्हाला भेटायला येतात. कधी स्वतःहून, तर कधी डॉक्टर पाठवतात तर कधी त्यांना शाळा सुचवते. पूर्वी शाररीक आजार घेवून पालक डॉक्टरांकडे जायचे पण दिवसेंदिवस मानसशास्त्राची गरज मला वाढलेली दिसते. मानसशास्त्र हे सगळ्या वयाच्या टप्प्यात काम करतात. पूर्वी मानास्शात्राकडे जाणारी व्यक्ती म्हणजे “वेडा”त्यालाच गरज लागते. पण आताच्या पिढीने थोड्या वेगळ्या दृष्टिने या क्षेत्राकडे पाहायला हवे आणि तसेच आपल्या मुलांमधील बदल सुद्धा टिपायला हवेत. मग पालक म्हणून कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात असे प्रश्न तुम्हांला पडला असेल काही मानसशास्त्रीय मुख्य नावे तुमच्या निदशर्नात आणून देते ती म्हणजे …. अटेन्शनडेफिसिट हायपर अॅक्टीव डीसॉरडर (Attention Deficit Hyperactive Disorder) : यामध्ये तीन प्रकार पडतात १. लक्ष नसणे २. चंचलता आणि ३.अस्थिरता. यातील कोणत्याही गोष्टीमुळे मुलांना त्रास होताना दिसतो.याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनात पाहायला मिळतो.जसे कि अभ्यास करताना एका जागी स्थिर न बसणे, घाई करणे, लहान सहान चुका करणे. अशा विविध अडथळ्यामुळे खूप त्रास होताना दिसतो. ऑटीझम(Autism). : अशी…
मुलांची मानसिकता
